पुणे

थंडीच्या कडाक्‍याने पुणेकर गारठले;दिवसभर उबदार कपडे घालून व्यवहार

सकाळवृत्तसेवा

पुणे - थंडीच्या कडाक्‍याने सोमवारी रात्री पुणेकर गारठले. त्यामुळे चौका-चौकात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत होते. किमान तापमानाचा पारा मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ८.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. येत्या २४ तासांमध्ये किमान तापमान अंशतः वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

पुण्यात दोन दिवसांपासून कडाक्‍याची थंडी पडत आहे. पहाटे धुके पडत असून, सकाळी उशिरापर्यंत हे धुके जमिनीलगत रेंगाळत असल्याचे दृश्‍य उपनगरांमध्ये दिसत होते. दिवसभर हवेत गारठा असल्याने भर दिवसाही उबदार कपडे घालून आपले दैनंदिन व्यवहार पुणेकर करत असल्याचे चित्र रस्त्या-रस्त्यावर दिसत होते. 

शिवाजीनगर येथे मंगळवारी सकाळपर्यंत किमान तापमानाचा पारा २.७ अंश सेल्सिअसने कमी होऊन ८.१ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्याचवेळी पाषाण येथे ८.८ आणि लोहगाव येथे १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरातील हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे थंडीचा कडाका अंशतः कमी होईल. 

का वाढली थंडी?
हिमालयामध्ये पाच ते सहा दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तरेतील बहुतांश राज्यांमध्ये थंडीचा लाट पसरली आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी भरली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मध्य प्रदेशातील पंचमढी येथे मंगळवारी देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विदर्भात थंडीची लाट
विदर्भात गुरुवारी (ता. २४) आणि शुक्रवारी (ता. २५) थंडीचा लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला. राज्यात सर्वांत कमी तापमान परभणी येथे ७.६ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. राज्यातील २८ शहरांमधील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT